Breaking परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Breaking परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल- Saam Tv

मुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह Marine Drive पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परमवीर सिंह यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.एका व्यावसायिकाला खंडणी Ransom मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे. Offence of ransom registered against Parambir singh

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखिल पहा

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी व इतर सहकारी साथीदार व संबंधित पोलीस अधिकारी यांचे विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 299/ 21, कलम 387,388,389,403,409,420,423,464,465,467,468,471,120(b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील 2 आरोपी अटक करण्यात आले आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com