Eknath Shinde News : जुन्या पेन्शनबाबत महत्वाची अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी विधानभवनात केलं मोठं भाष्य

राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam tv

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. 'जुन्या पेन्शनबाबत समिती नेमली आहे. ३ महिन्यात अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात दिली.

जुन्या पेन्शनबाबत आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात म्हटले की, 'जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर काय परिणाम होईल, याबाबत समिती नेमली आहे. जुन्या पेन्शनबाबतची बाब ही सर्व संघटनांनी लक्षात आणून दिली आहे. माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. दोन्ही विरोधी पक्षनेते उपस्थित होते'.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणाले, 'जुन्या पेन्शनबाबत (Pension) शासनाची भूमिका सहानुभूतीची आहे. जे काही सूत्र ठरेल त्यानुसार त्यांना देखील लाभ होईल. कर्मचाऱ्यांनी संपाबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. लोकांची गैरसोय होते, त्यासाठी संप मागे घ्यायला हवा.

'शासन म्हणून कारभार चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. शासन याबाबत सकारत्मक आहे. आर्थिक परिणाम काय होईल, याबाबत सूचना करण्यात आल्या. हे तपासण्याची आवश्यकता आहे. आपण चर्चेद्वारे प्रश्न सोडवू. संप मागे घ्यावा अशी विनंती करतो',असेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Video : फक्त एका कारणावरून आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण? सोलापूर विद्यापीठातील व्हिडिओ आला समोर

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या?

>> नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.

>> कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे, सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा.

>> सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तत्काळ हटवा.

>> अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या.

>> सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा. (वाहतूक, शैक्षणिक व इतर भत्ते)

>> चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करु नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा. ७.शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तत्काळ सोडवा.

>> निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.

>> नवीन शिक्षण धोरण रद्द करा.

>> नर्सेस / आरोग्य कर्मचा-यांच्या आर्थिक व सेवाविषयक समस्यांचे तत्काळ निराकरण करा.

>> मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सद्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरु करण्यात यावे.

>> उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ववत सुरु करण्यात यावी. या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यात यावे.

>> वय वर्षे ८० ते १०० या वयातील निवृत्त कर्मचान्यांसाठी केंद्र शासनाने विहित केल्याप्रमाणे मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी.

>> कामगार-कर्मचारी-शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालकधार्जिणे बदल रद्द करा.

Eknath Shinde
Uddhav Thackeray News: ठाकरेंना मोठा दिलासा, संपत्ती चौकशीसंदर्भातील गौरी भिडेंची याचिका HC ने फेटाळली, २५ हजार दंड

>> आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजने व्यतिरिक्त एकस्तर वेतनवाढीचा लाभ कायम ठेवण्यात यावा व संबंधित कर्मचान्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात यावा.

>> शिक्षणसेवक, ग्रामसेवक आदिना मिळणान्या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करुन वृद्धि करण्यात यावी.

>> शासकीय विभागात कोणत्याही स्वरुपाच्या खाजगीकरण/ कंत्राटीकरणास सक्त मज्जाव करण्यात यावा.

>> पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटींचे निराकरण करण्यास बक्षी समितीला अपयश आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल पुनर्विचार करुन सर्व संबंधित प्रवर्ग कर्मचारी-शिक्षकांना न्याय देण्यात यावा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com