
Pune News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याने महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्यात एकीकडे सावरकर वाद सुरू असतानाच आता भाजपकडूनही शिवरायांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यपालांचा निषेध करत राज्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. यात राज्यपालांचा खपूस समाचार घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsing koshyari )यांनी या आधी देखील अनेक वेळा छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. अशात आता पुन्हा एकदा त्यांनी शिवरायांची तुलना केल्याने विरोधक आक्रम झालेले दिसत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदिप शशिकांत काळे यांनी पुण्यात राज्यपालांविरोधात बॅनरबाजी केली आहे. यात त्यांनी राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्याला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत पुण्यात अनेक ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे. यात " आमचं आराध्य दैवत छत्रपती होते, आहेत आणि राहणारच... उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचा जाहीर निषेध...!", असे लिहिले आहे. तसेच पुढे टिप देत राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाईल असेही लिहिले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आलेली ही जहरी टिका सगळ्यांचेच लक्ष वेधुन घेत आहे. या आधी राज्यपालांनी त्यांच्या एका भाषणात मराठी माणसाला कमी लेखणारे वक्तव्य केले होते. तसेच आता छत्रपातींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण आणखीन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.