'पन्नास खोके, एकदम ओके'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा

खातेवाटपानंतर शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून हे अधिवेशन १७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे चालणार आहे.
Maharashtra assembly session today
Maharashtra assembly session todaySaam TV

Monsoon session of maharashtra assembly 2022: आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारे भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेले पाहायला मिळणार आहे.

याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळपासून विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्व विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात आंदोलन केलं यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली.

यावेळी प्रामुख्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांवर विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला. 'पन्नास खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय' अशा प्रकारच्या घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटावर निशाणा साधला. शिंदे गटातील आमदारांनी त्यांच्या गटात जाण्यासाठी ५० कोटी घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जातो याच पार्श्वभूमीवर ही घोषणाबाजी करण्यात येत होती.

पाहा व्हिडीओ -

तर शिंदे-फडणवीस सरकार तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा सरकार मधील मंत्र्यांनी दिल्या. या सर्व घोषणाबाजी दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांनी विधान परिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करत विधानसभेत प्रवेश केला.

दरम्यान, खातेवाटपानंतर शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून हे अधिवेशन १७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे चालणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला अनेक मुद्द्यावरुन घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com