ह्रदयद्रावक! दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोनं चिरडलं; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद (पहा Video)

घराच्या परिसरात खेळणाऱ्या एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळ बल्याणी परिसरात घडली आहे.
Accident
Accidentप्रदीप भणगे

टिटवाळा : घराच्या परिसरात खेळणाऱ्या एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला एका टेम्पोने चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळ (Titwala) बल्याणी परिसरात घडली आहे. अरसलान उर्फ बाबू अस या चिमुकल्याच नाव आहे. या टेम्पो चालकाच्या निष्ककजीपणामुळे या दीड वर्षाच्या अरसलानचा जीव गेला आहे.

पहा व्हिडीओ -

तीन मुलं खेळत असताना भरधाव आलेल्या टेम्पोने (Tempo) यातील एका चिमुरड्याला चिरडल्याचा धक्कादायक घटनेचा CCTV सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी या टेम्पो चालक सैफ फारुखि वर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती, दरम्यान या टेम्पो चालकाची जामिनावर सुटका देखील झाली आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच आपल्या मुलांना सुरक्षित जागेवरती खेळण्याकरता पाठविण्याची काळजी देखील पालकांनी घ्यायला हवी, याची जाणीव या अपघातामुेळे होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com