पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

बारामती तालुका गुन्हे शोध पथकाने शुभम विकास राजापुरे याला अटक केली आहे.
पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकाला अटकमंगेश कचरे

बारामती: पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी बारामती पोलिसांनी एकास सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहेत. बारामती तालुका गुन्हे शोध पथकाने शुभम विकास राजापुरे याला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा साहेब ठोंबरे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमलदार राहुल पांढरे नंदू जाधव विजय वाघमोडे विनोद लोखंडे रंणजीत मुळीक यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की एका खुनाच्या गुन्ह्यातील जामीनावर असलेल्या आरोपी शुभम विकास राजापुरे हा पॅरोल रजेवर सध्या असून त्याच्याकडे गावठी बनवायचे पिस्तूल आहे, आणि तो कमरेला लावून फिरत आहे.

पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
नितेश राणेंच्या विरोधात दौंड युवासेनेचं अनोखं आंदोलन

अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे शोध पथकाने तांदुळवाडी येथे सापळा रचून त्यास अटक केली आहे. त्यांची झाडाझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजूस गावठी बनवायचे पिस्तूल त्यामध्ये मॅक्झिन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली पोलिसांनी राजापुरे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com