Mukesh Ambani: मुकेश अंबानी धमकी प्रकरणी एकाला अटक; अफजल गुरुचे नाव का वापरले? याचा तपास सुरू

Threat Call To Mukesh Ambani: विष्णूने या अफजल गुरूचे नाव का वापरले, त्याची पार्श्वभूमी पोलिस तपासत आहेत.
Mukesh Ambani
Mukesh AmbaniSaam Tv

मुंबई: रिलायन्स इंडिया कंपनीचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना काल, १५ ऑगस्टला धमकीचा फोन कॉल (Threat Call) आला होता. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या (Hospital) डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला होता. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आरोपी विष्णू भोमिक याला दहिसर परिसरातून पोलिसानी अटक केली आहे. (Mukesh Ambani Latest News)

हे देखील पाहा -

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एकूण ८ धमकीचे कॉल आल्याचे सूत्रांनी सांगितले, पोलीसांनी (Police) या कॉलची तपासणी केल्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात त्याने अफजल नावाने धमकी दिल्याचे समोर आले होते. मात्र चौकशीत विष्णूने घेतलेले नाव हे एक दहशतवाद्याचे होते. हा दहशतवादी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून अफजलगुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आधीच दहशतवाद्यांंच्या रडारवर भारतातले उद्योगपती आहेत. त्या अनुशंगाने त्यांना सुरक्षाही पुरवली जाते. मात्र विष्णूने या अफजल गुरूचे नाव का वापरले, त्याची पार्श्वभूमी पोलिस तपासत आहेत.

Mukesh Ambani
Road Hypnosis : रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? हा कसा होतो ? विनायक मेटेंचा मृत्यूला जबाबदार कोण?

दरम्यान मागील वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या हाती घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशावरून एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. मुकेश अंबानींना अनेकदा अशा धमक्या देण्यात आल्या आहेतय

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com