Online Fraud: फसव्या ग्राहकांपासून सावधान! ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली होतेय फसवणूक

पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासांमध्ये या तीन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद खालील उर्फ अनस अब्दुल कलाम शेख ( 23 ), इब्राहीम समसुद्दिन काजी (27), आयुष सुहास जगदाळे अशी या आरोपींची नाव आहे. हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेश मधले राहणारे आहेत.
Sakinaka Police Station
Sakinaka Police Station सुरज सावंत

मुंबई - आपल्या दुकानात खरेदीसाठी आलेली व्यक्ती जर खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे आॅनलाईन देत असले, तर ते पैसे नक्की आपल्या खात्यात जमा झाले आहेत का ? याची खात्री करून घ्या कारण आॅनलाईन पैसे देण्याच्या नावाखाली पैसे खात्यातावर टाकल्याचा बनावट मेसेज दाखवून फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या टोळीचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. (Online Fraud Through Spoof Paytm app in mumbai)

साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) परिसरात हॉटेलमध्ये (Hotel) भाड्याने राहण्यासाठी तीन जणांनी रूम बुक केले. या तिघांचे बिल पन्नास हजार पर्यंत झाले. हाँटेलमधून निघताना तिघांनी हॉटेल मॅनेजरला Spoof Paytm app मधून पेमेंट केल्याचे भासवले. मोबाइलवरील पेमेंट (Mobile Payment) झाल्याचा मेसेज पाहून हाॅटेल मेनेजरनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून जाऊ दिले.

हे देखील पहा -

जेव्हा हॉटेल मालकाने बँकेमध्ये चौकशी केली असता त्यावेळी बँकेच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते. हाॅटेल मेनेजरने युट्युबवर Spoof Payatm app च्या फसवणुकीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, आपल्या सोबत सुद्धा फसवणूक झाली आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

Sakinaka Police Station
Beed: वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीएची कारवाई

पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासांमध्ये या तीन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद खालील उर्फ अनस अब्दुल कलाम शेख ( 23 ), इब्राहीम समसुद्दिन काजी (27), आयुष सुहास जगदाळे अशी या आरोपींची नाव आहे. हे सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेश मधले राहणारे आहेत. या आरोपींनी Spoof Payatm app नावाने मुंबईत अजून कुठे- कुठे फसवणूक केली. या टोळीमध्ये आणखी कोण साथीदार आहेत याची चौकशी साकीनाका पोलिस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com