Maharashtra Budget Session: अवकाळी पावसानं शेतकऱ्याला रडवले; विधानसभेत सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर बरसले

Ajit Pawar Vs Eknath Shinde: शेतकऱ्यांना मदत करा नाहीत खुर्च्या खाली करा, अशा घोषणाबाजी विरोधीपक्षाने विधानसभेत केली.
Ajit Pawar - Eknath Shinde
Ajit Pawar - Eknath ShindeSaam TV

Mumbai News: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या याच मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधपक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भडकल्याचं पाहायला मिळालं.

शेतकऱ्यांना मदत करा नाहीत खुर्च्या खाली करा, अशा घोषणाबाजी विरोधीपक्षाने विधानसभेत केली. विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश प्रशासनाला दिले आहे.

Ajit Pawar - Eknath Shinde
Unseasonal Rain: नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, आमची देखील हीच भावना आहे. पैसे देतो देणार नाही असे नाही. फक्त इथे राजकारण करायचे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला विचारला. (Latest News)

याआधी नुकसान भरपाई दिली. आता देखील सरकार पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत देणार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पण राजकारण करू नका. शेतकऱ्यांच्या मागे सगळ्यांनी एकत्र उभे राहिले पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. आम्ही तुमच्यासारखी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Ajit Pawar - Eknath Shinde
Bringle Price: बळीराजाची पुन्हा थट्टा! कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर

कांद्याचे दर कोसळल्याच्या मुद्दावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, नाफेदकडून कांद्याची खरेदी सुरू झाली आहे. सगळीकडे नाही काही ठिकाणी सुरू झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ, मदत करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com