आमच्या शंकांचं निरसन झालं; पवारांसोबतच्या बैठकीनंतर ब्राम्हण संघटना समाधानी

Sharad Pawar Organized brahman organization meeting In Pune : ही बैठक अर्धा तास होणार होती मात्र याला १ तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुच चर्चा झाल्या.
NCP Chief Sharad Pawar Organized brahman organization meeting in pune
NCP Chief Sharad Pawar Organized brahman organization meeting in puneSaam Tv

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांकडून पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आज (२१ मे) संध्याकाळी पाच वाजता ब्राम्हण संघटानांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी २० ते २२ संघटनाना पवारांनी (Sharad Pawar) निमंत्रण दिलं होतं. या चर्चेला २० ब्राम्हण संघटानांच्या ६० ब्राम्हण पदाधिकाऱ्यांशी पवारांशी चर्चा झाली. या बैठकीनंतर ब्राम्हण समाजाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांशी बोलून समाधानी असून आमच्या शंकांचं निरसन झालं आहे अशी भावना ब्राम्हण समाजाच्या प्रतिनिधींनी दिली आहे. ब्राम्हण संघटनेचे नेत गोविंद कुलकर्णी म्हणाले की, शरद पवार सोबत खेळीमेळीत बैठक झाली. ब्राम्हण समाजाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्या नेत्यांवर आळा घातला पाहिजे. जे कोणी जातीवादी बोलणार असतील तर त्यावर आम्ही चर्चा करू. पवारांनी अनेक शंका निरसन करण्याच काम केलं. भगवान परशुराम महामंडळ मिळालं पाहिजे ही मागणी होती, ते लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार आहेत असं ते म्हणाले आहेत.

(Our doubts were resolved; Reaction of Brahmin organizations after meeting with Pawar in Pune)

हे देखील पाहा -

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ब्राह्मण समाजविरोधी विधान केलं होतं. मिटकरी यांचं ब्राह्मण समाजविरोधी विधान आणि पवारांचे कविता वाचन यामुळं राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं. त्यानंतर झालेल्या टीका-टिपण्णीनंतर ते दुषित वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) निवळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी स्वत: शरद पवारांनी बैठक आयोजित करून राज्यातील २० ते २२ संघटनांना पुण्यात चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र, काही ब्राह्मण संघटनांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.

दुषित वातावरण निवळण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

एकीकडे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये आणि दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतं यामुळे वातावरण चांगलंच दुषित झाले. ते दुषित वातावरण निवळण्याचा पुण्यातील या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे.

या संघटनांचा पवारांच्या बैठकीवर बहिष्कार

काही ब्राह्मण संघटनांनी शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. परशुराम सेवा संघाचा त्यात समावेश आहे. परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे पत्रक काढत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे गेले २० वर्ष ब्राह्मण विरोधी भूमिका हे बहिष्काराचे कारण आहे. काही राजकीय नेते आपल्या आपले लिखाण तसेच वक्तव्यातून द्वेषमुलक वातावरण तयार करीत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब्राह्मण विरोधी येत असलेल्या भूमिकांमुळे आम्ही हा बहिष्कार घालत आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. तसेच ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या बैठकीवर बहिष्कार टाकला.

NCP Chief Sharad Pawar Organized brahman organization meeting in pune
अजित पवारांनी पुतळ्यांवरुन पदाधिकाऱ्यांना खडसावले

नेमकं काय आहे प्रकरण?

साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता भरसभेत वाचून दाखवली होती. त्यानंतर शरद पवारांवर भाजपसहित अनेक ब्राह्मण संघटनांनी टीका केली होती. आमदार अमोल मिटकरी यांनीही काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजविरोधी विधान केलं होतं. या साऱ्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं. सोशल मीडियावरही त्या कवितेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार टीकेचे धनी ठरले होते. ते सारे दूषित वातावरण निवळण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com