Cabinet Expansion: आमची यादी फायनल आहे; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दीपक केसरकर स्पष्टच बोलले

Deepak kesarkar on Cabinet Expansion: "मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा होतोय याचा अर्थ मंत्रिमंडळ याद्या फायनल झाल्या आहेत हे समजावे" असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं आहे.
Deepak kesarkar on Cabinet Expansion
Deepak kesarkar on Cabinet Expansionsaam tv

मुंबई: राज्यात भाजप आणि बंडखोर एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला तरी मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. त्यात शिवसेना आणि बंडखोरांमधील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ही सुनावणी आता ८ ऑगस्टला होणार आहे. न्यायालयाने या सर्व प्रकरणावर अद्याप निकाल न आल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्यात अडचणी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. "मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा होतोय याचा अर्थ मंत्रिमंडळ याद्या फायनल झाल्या आहेत हे समजावे" असं सूचक वक्तव्य करत "आमची यादी फायनल आहे" असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. (Deepak Kesarkar Latest News)

हे देखील पाहा -

दीपक केसरकर म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार करू नका असे न्यायालयाने म्हटले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार हा मुख्यमंत्री यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी व्हावा हे मुख्यमंत्री राज्यपाल यांना कवळतील. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा होतोय याचा अर्थ मंत्रिमंडळ याद्या फायनल झाल्या आहेत हे समजावे असं म्हणत आमची यादी फायनल आहे असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे, तसेच जनतेकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कौतुक होत आहे, रोज हजारो लोक भेटायला येत आहेत असंही केसरकर म्हणाले आहेत.

मंत्री होण्याची संधी मिळाली तर...

आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबाबत अब्दुल सत्तार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. न्यायालयात आम्हालाच यश मिळेल हा विश्वास आहे. पक्षातील अधिक संख्याबळ हे आमच्याकडे आहे. सामंत यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि आरोपींवर कारवाई होत असतांना असे कोणी जाऊन महासंचालकांची भेट घेणे चुकीचे आहे, त्या जागी मुख्यमंत्री असते तर? कोणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, मला मंत्री होण्याची संधी मिळाली तर जनतेसाठी काम करेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

Deepak kesarkar on Cabinet Expansion
Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना जामीन नाहीच; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम

दरम्यान शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच, शुक्रवारी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी संभव्य मंत्र्यांची यादी समोर आली असून, यामध्ये भाजपचे आठ आणि शिंदे गटाचे सात मंत्री पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्या टप्प्यात वरिष्ठ आमदार शपथ घेतील असे सांगितले जात आहे. भाजप गोटातील संभाव्य मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, रवि चव्हाण, बबनराव लोणीकार, नितेश राणे यांचा नावाची चर्चा आहे. तर, या विस्तारामध्ये शिंदे गटातील सर्व माजी मंत्री शपथ घेणार असून यात दाद भूसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, बच्चू कडू किंवा रवि राणा आदींच्या नावाची चर्चा आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com