ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले

'ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्या' या नाना पटोलेंच्या वक्तव्यावरती; नाना यांनी आपलं मत समितीसमोर मांडावं असा सल्ला अनिल परबांनी दिला.
ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले
ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोलेSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या सागर बंगल्यावरती भेट घेतली. विधान परिषद निवडणूकीसंदर्भात (Legislative Council Elections) चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले. यावेळी पटोलेंनी त्यांनी अनेक मुद्दांवरती भाष्य केलं यावेळी त्यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या नागपूर दौऱ्याबद्दलही भाष्य केलं तसेच त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाबोबत मोठं विधानं केलं आहे.

हे देखील पहा -

ते म्हणाले 'ST कर्मचाऱ्यांच आंदोलन हे चिंतेचा विषय असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आहे. पण तरी पुन्हा ST कर्मचारी (ST staff) मैदानात उतरले आहेत. तसेच भाजपची दुटप्पी भूमिका आहे. केंद्रात खासगीकरण झाले आहे त्याचे काय? ST कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप BJP राजकारण करत आहे. मात्र आमची देखील ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्या अशीच भूमिका असल्याचं वक्तव्यं पटोलेंनी केल्याने अनिल परबांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

ST Strike : ST कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घ्यावं हीच काँग्रेसची भूमिका - नाना पटोले
...त्यामुळे आम्ही बारामतीला गेलो तर शरद पवारांनाही अडचण नसावी; पवारांच्या दौऱ्यावर पटोलेंचं वक्तव्य

त्यामुळे ST कर्मचाऱ्यांच्या संपावरून 'मविआ' (MVA) मध्ये नवीन वाद सुरु? होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता नाना पटोले यांनी आपलं मत समितीसमोर मांडावं असा सल्ला अनिल परबांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com