Mumbai: "तुम्ही करा कितीही हल्ला, मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला" - किशोरी पेडणेकर

Mumbai Mayor Kishori Pednekar: मतदार बघतोय दर आठवड्याला भाजप मुखवटे बदलतात. एक आठवडा आशिष शेलार, एक आठवडा अतुल भातखळकर, एक आठवडा अमित साटम असा टोला त्यांनी लगावला आहे.
Mumbai Mayor Kishori Pednekar Live
Mumbai Mayor Kishori Pednekar LiveSaam Tv

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने शिवसेनेवर टीका करण्यात येतेय, याबाबात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या की, तुम्ही कितीही हल्ले करा, आमचा शिवसेनेचा (Shivsena) किल्ला मजबूत आहे. कारण मतदार बघतोय दर आठवड्याला भाजप मुखवटे बदलतात. एक आठवडा आशिष शेलार, एक आठवडा अतुल भातखळकर, एक आठवडा अमित साटम. म्हणून मुख्यमंत्री बरोबर बोलतात की, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. (our shivsena fort is a strong Mumbai Mayor kishori pednekar slams to bjp)

हे देखील पहा -

पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईत (Mumbai) भाजपच्या प्रत्येकाने एक अजेंडा घेतला आहे. इकबाल चहल त्यांच्या हिटलिस्टवर का असतात? कोरोना काळात चहल यांनी चांगलं काम केलं हे भाजप ला पाहवत नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच त्या म्हणाल्या की गेल्या पंचवीस वर्षातील 20 वर्ष भाजप आमच्या सोबतच होती मांडीवर बसले होते तेव्हा भाजप का बोलले नाही भाजपचा स्तर इतका खाली गेला आहे. २५ वर्षांत एकही वर्ष भाजपचा स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा नाही. महापौर आमचा होता. आमचा काही यात हात नाही, कारण सर्व अधिकार त्यांनी स्वत:कडे ठेवले होते. अविश्वास ठराव हा सगळ्यांचा सहमतीने घ्यावा लागतो. स्थायी समितीमध्ये चर्चा होत होती तेव्हा का बोलले नाही. भाजप आरोप करत असते त्यांनी सिद्ध करावे असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar Live
BMC: तुम्ही कोरोनाची घरीच टेस्ट करत असाल तर सावधान!

प्राण्यांच्या स्मशानभुमीबद्दल पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत मुक्या प्राण्यांची स्मशानभूमी नाही. मुक्या पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी उभारण्यात येणार आहे. नगरसेविका घोसाळकर यांच्या प्रभागात शवदाहिनी उभारणार असून सात झोन मध्ये मुंबईत मुक्या प्राण्यांची स्मशानभूमी उभारणार असल्याचं त्या म्हणाल्या.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com