पुण्यातील हॉटेल ‘गारवा'च्या मालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पुण्यातील उरुळी कांचन येथील प्रसिद्ध ‘गारवा हॉटेल’चे मालक रामदास आखाडे यांच्यावर अचानक एका तरुणाने येऊन कोयत्याने सपासप वार केले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पुण्यातील हॉटेल ‘गारवा'च्या मालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
पुण्यातील हॉटेल ‘गारवा'च्या मालकावर कोयत्याने प्राणघातक हल्लासागर आव्हाड

पुणे - उरुळी कांचन Uruli Kanchan येथील प्रसिद्ध ‘गारवा हॉटेल’चे मालक owner of hotel garwa रामदास आखाडे santosh akhade यांच्यावर अचानक एका तरुणाने येऊन कोयत्याने attacked with a scythe सपासप वार केले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत CCTV कैद झाली आहे. अद्याप तरी हल्लेखोराचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे जीवेघेणा हल्ला का झाला आणि कोणी केला, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. या घटनेने पुण्यातील लोणी काळभोर loni kalbhor भागात खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री पावणे नऊ वाजता ही घटना घडली आहे. रामदास रघुनाथ आखाडे (वय 38) असे गंभीर जखमी झालेल्या गारवा हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात loni kalbhor police station संतोष आखाडे यांनी तक्रार दिली आहे. Owner of hotel 'Garwa' in Pune attacked with a scythe

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरात महामार्गावर highway गारवा हॉटेल आहे. व्हेज - नॉनव्हेजसाठी असलेले प्रसिद्ध हॉटेल आहे. काल (रविवार) साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलच्या बाहेर खुर्चीवर बसले होते. फोनवर बोलत असतानाच त्याचवेळी अचानक एक मुलगा चालत त्यांच्याजवळ आला. त्याने जवळ येताच शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि त्यांच्या डोक्यात सपासप वार केले. रामदास हे खाली कोसळले. त्यावेळी तो तेथून पसार झाला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले रामदास हे बेशुद्ध झाले होते, त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. पण, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर हल्ला कोणी आणि का केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने मात्र येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com