दहिसर मध्ये ज्वेलर्स दरोड्यात मालकाची गोळी झाडून हत्या ! --- (पहा व्हिडीओ)

दहिसर पूर्व च्या रावलपाडा परिसरात सोन्याच्या दुकानात शिरुन ज्वेलर मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.
दहिसर मध्ये ज्वेलर्स दरोड्यात मालकाची गोळी झाडून हत्या ! --- (पहा व्हिडीओ)
दहिसर मध्ये ज्वेलर्स दरोड्यात मालकाची गोळी झाडून हत्या ! --- (पहा व्हिडीओ)चेतन इंगळे

चेतन इंगळे

मुंबई : दहिसर Dahisar पूर्व च्या रावलपाडा परिसरात सोन्याच्या दुकानात शिरुन ज्वेलर मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत Mumbai घडली आहे. ओम साईराज ज्वेलर्सचे 45 वर्षीय मालक शैलेंद्र रमाकांत पांडेय यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबारात करण्यात आला आहे. या गोळीबारात त्यांच्या मृत्य झाला आहे. Owner shot dead in jewelers robbery in Dahisar

हत्येनंतर तिघेही जण दुकान लुटून पसार झाले. यातील एका आरोपीला पोलिसांनी Police ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बंदुकीचा धाक दाखवून तिघे जण ओम साईराज ज्वेलर्समध्ये शिरले होते. ज्वेलर्स मालकाने त्यांना विरोध केला असता लुटारुंनी त्याच्यावर चक्क गोळी झाडली आहे. यामध्ये शैलेंद्र रमाकांत पांडेय यांचा जागीच मृत्यू झाला आहे. Owner shot dead in jewelers robbery in Dahisar

तिन्ही आरोपी हत्येनंतर दुकानात लूट करुन पसार झाले आहेत. या घटनेनंतर दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील Vishwas Nangre Patil यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

दहिसर मध्ये ज्वेलर्स दरोड्यात मालकाची गोळी झाडून हत्या ! --- (पहा व्हिडीओ)
वृद्ध दाम्पत्याच्या गळ्याला चाकू लावून लाखोंची चोरी !

या मधील तिन्ही लुटारू हे एकाच बाईकवरुन आले होते. दुकानातील सोनं लुटून ते पसार झाले आहेत. मुंबईच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर मुंबई पोलिसांनी नाकाबंदी Blockade लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या तिघांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com