पुढच्या आठ दिवसांत मोठा संघर्ष उभा करुया; बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरांचे गाडी मालकाना आवाहन

पक्ष,पार्टी बाजुला ठेवून बैल वाचविण्यासाठी हा संघर्ष हाती घेतला आहे .
पुढच्या आठ दिवसांत मोठा संघर्ष उभा करुया; बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरांचे गाडी मालकाना आवाहन
पुढच्या आठ दिवसांत मोठा संघर्ष उभा करुया; बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरांचे गाडी मालकाना आवाहनSaamTV

पुणे : बैलगाडा शर्यती बंदी विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padlkar) पुन्हा एकदा आंदोलनाची हाक गाडी मालकांना दिली आहे. येत्य़ा आठ दिवसांत मोठ्या आंदोलनाचा एल्गार करणार असल्याची माहिती स्वत: पडळकर यांनी दिली असून त्यांनी बैलगाडा मालकांना 'तुम्ही मला फक्त काहीच दिवस साथ द्या' असं आवाहन केलं आहे. Padalkar's appeal to bullock cart owne

हे देखील पहा-

बैलगाडा शर्यत (Bullock Cart) बंद होऊन अनेक वर्ष गेली मात्र सरकारला बैलगाडा मालकांच्या ताकदीचा अंदाज नव्हता मात्र ही ताकद तुम्ही झरेमध्ये (Zare) दाखवली आहे त्यामुळे आता पुढचे काहीच दिवस साथ द्या. बैलगाडा शर्यतीत राजकारण नको, पक्ष,पार्टी बाजुला ठेवुन बैल वाचविण्यासाठीचा हा संघर्ष हाती घेतला आहे पुढच्या आठ दिवसांत मोठा संघर्ष उभा करुया म्हणत पडळकरांनी नव्या आंदोलनाची (Agitation) तयारी सुरु केली असल्याचे समजते आहे. आज ते राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे बैलगाडा मालकांच्या बैठकीत बोलत होते त्यावेळी त्यांनी आपल्या लढ्याला साथ देण्याच बैलगाडा मालकांना साकडं घातलं आहे.

राजकीय शर्यत

बैलगाडा शर्यतीसाठी आम्हीसुध्दा प्रयत्नशील आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी झरे येथील पडळकरांनी आयोजीत बैलगाडा शर्यतीनंतर केले होते. तसेच पडळकरांची फक्त स्टंटबाजी सुरु असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केले होते, आम्ही देखील बैलगाडा शर्यंत सुरु व्हावी याच मताचे आहोत मात्र यासाठी सर्व कायदेशीर बाबी पुर्ण कराव्या लागणार आहेत तसेच बैलगाड्यांच्या शर्यती सुरु व्हाव्या या मागणीसाठी सर्वात आधी आपण लढा सुरु केला असल्याचही आढळराव पाटील म्हणाले होते.

पुढच्या आठ दिवसांत मोठा संघर्ष उभा करुया; बैलगाडा शर्यतीसाठी पडळकरांचे गाडी मालकाना आवाहन
'...तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील'; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती! (पहा व्हिडीओ)

एकंदरीतच हा विषय राजकारणासह बैलगाडा मालकांच्या भावनांचा असल्याने सगळेजण पाठींबा आहे म्हणत असले तरी निर्णय होत नाही आणि हीच संधी साधून पडळकर सध्या बैलगाडा शर्यंतींसाठी रान उठवूत राज्य सरकारला कोंडीत पकडत आहेत म्हणायला हरकत नाही.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com