Palghar Fire News : कासा बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक; कोट्यावधींचे नुकसान

या घटनेनंतर नागरिकांनी बाजारपेठेत धाव घेतली.
palghar, kasa market fire, fire brigade
palghar, kasa market fire, fire brigadesaam tv

Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा येथील मुख्य बाजारपेठेत आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत (kasa market fire) पाच दुकानं जळून खाक झाली आहे. या घटनेती काेट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

palghar, kasa market fire, fire brigade
Maratha Kranti Morcha चा राज्य सरकारला अल्टीमेटम; पालकमंत्र्याच्या घरासमोर छेडणार गोंधळ घालो आंदोलन

पालघर (palghar) जिल्ह्यातील कासा येथील मुख्य बाजारपेठेतील पोलीस ठाण्यानजीकच्या असणारी पाच दुकानं पहाटेच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या ठिकाणी असणारी चप्पल आणि शोभेच्या वस्तू यांच्यासह आणखी तीन दुकानांना भीषण आगीच्या झळा बसल्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

palghar, kasa market fire, fire brigade
Sharad Pawar राजकीय ब्लॅकमेलर; Nilesh Rane यांची टीका, उद्धव ठाकरेंनाही इशारा (पाहा व्हिडिओ)

या घटनेची माहिती कळताच तत्काळ अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास (fire brigade) यश आले. दरम्यान या आगीत क्षणार्धात दुकानांसह दुकानांमधील कोट्यावधी रुपयांच साहित्य जळून खाक झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com