Panvel Crime News: संतापजनक! कामावरुन घरी जाणाऱ्या महिलेवर दोघांचा अत्याचार, घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षाचालकाचे कृत्य

आरडा ओरडा केल्यानंतर तिला मारहाण करुन दोघा नराधमांनी पळ काढला. यासंबंधी पनवेल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Panvel Crime News
Panvel Crime NewsSaamTv

सिद्धेश म्हात्रे..

Panvel: पनवेल मधून महिलेवर अत्याचाराची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कामावरुन घरी चाललेल्या महिलेवर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पिडितीने आरडा ओरडा केल्यानंतर तिला मारहाण करुन दोघा नराधमांनी पळ काढला. यासंबंधी पनवेल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Panvel News)

Panvel Crime News
Graduate Constituency Election : हे काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही, शुभांगी पाटलांना अधिका-यांनी हटकलं

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पनवेल मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला 29 तारखेला रात्री दोन वाजता खोपोली वरून काम आटोपून आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी पनवेल मध्ये आली होती. यावेळी एका रिक्षा चालकाने करंजाडे येथे राहत्या घरी सोडण्याचे आश्वासन देऊन रिक्षात बसवले.

मात्र सदर महिलेला घरी न नेता आपल्या मित्राच्या मदतीने रेल्वे पटरी नजदिक असलेल्या एका पडीक इमारतीच्या गच्चीवर नेले. आणि जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला.

Panvel Crime News
Kolhapur Crime : शिक्षक की हैवान? नववी-दहावीच्या विद्यार्थीनींना दाखवत होता 'तसले' व्हिडीओ

यावेळी आरडा ओरडा केल्यावर तिला मारहाण करून दोघां नराधमांनी तेथून पळ काढला. पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन एका नराधमाला अटक केली तर एक जण अद्यापही फरार आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com