पगारवाढ केली असताना संप कायम ठेवाल तर; परबांनी ST कर्मचाऱ्यांना दिला पगार कपातीचा इशारा

शासनाने भूमिका जाहीर केली आहे. ज्या काही चर्चा करायच्या आहेत हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही नाही म्हणत नाही, मात्र ST संप सुरू असताना चर्चा होणार नाही.
Anil Parab
Anil Parab SaamTV

मुंबई : आज संयुक्त कृती समिती आणि अनिल परब यांच्यामध्ये आज एक बैठक पार पडली यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये परिवहन मंत्र्यांनी बैठकीमधील मुद्यांवरती झालेले निर्णय सांगितले. राज्यसरकारने तोडगा काढून जी पगारवाढ केली होती त्यामुळे कामगारांनी कामावर येण्याची इच्छा दाखवली युनियन कृती समिती (Union Action Committee) चर्चा करून कामगारांचे म्हणनं आणि मानसिकता बघितली यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे परब यांनी सांगितले. तसेच दिलेली पगारवाढ ही कुल वेतनात दिलेली असल्याने ग्रेडमध्ये तफावत असू शकते. मूळ वेतनात पगारवाढ होते तेव्हा गोंधळ होऊ शकतो. त्याला कोणत्या ग्रेडमध्ये ठेवायचं हे नंतर ठरवलं जात मात्र या सर्व गोंधळावरती संप संपेल त्यावेळी यावर बसून निर्णय काढता येईल.

कनिष्ठ कामगार वरीष्ठ कामगारांच्यावर जाणार नाही हेही पाहू संपाबाबत संभ्रम आहे. विलीनीकरणाबाबतची समज, गैरसमज यावर पण चर्चा झाली. काही जाचक अटींबाबत विचार करणार नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन देखील परब यांनी यावेळी दिलं.

Anil Parab
जयंत पाटलांनी मानले राणेंचे आभार; म्हणाले 'यावेळी आम्हाला जास्त मुदत दिलीत'

तसेच उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार (Uddhav Thackeray, Ajit Pawar, Sharad Pawar) या सगळ्यांच्या मदतीने आर्थिक दिलासा राज्यसरकारने दिला आहे. तसेच कामगारांच्या नोकरीची हमी, सुरक्षा देखील मान्य केलं आहे. वेतनवाढ भरगोस दिली फक्त एक मुद्दा जो सरकारच्या हातात नाही कोर्टात आहे. त्याचा अहवाल आल्यावर विचार करता येईल असही ते म्हणाले. मात्र तोपर्यंत एसटी बंद ठेवन हे ST कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना पण परवडणार नाही. प्रत्येकाची नाळ एसटीशी जोडली आहे कामगारांना आवाहन करावे की लवकर लोकांनी रुजू व्हावं लहान मोठ्या गोष्टींवर चर्चा करायचीय तयारी आहे. आर्थिक भार सहन करून संप पैसे देऊन संप सुर असेल तर पैसे न देता संप सुरू ठेवला तर काय वाईट? ST संप सुरळीत झाला तर त्याच उत्तर शोधता येईल असही ते यावेळी म्हणाले.

7 वा वेतनाबाबत निर्णय घेता येणार नाही -

आमच्याकडे कामगारांचे निरोप येत आहे कि आम्हाला उद्याचा दिवस द्यावा आम्हाला कामावर यायच आहे. मात्र जर कामगार कामावर आले नाही तर कर्मचाऱ्यांच निलंबन करावं लागेल असा इशाराही परबांना यावेळी दिला. तसेच 7 वा वेतनाबाबत कोणताही निर्णय आता घेता येणार नाही. शासनाने भूमिका जाहीर केली आहे. ज्या काही चर्चा करायची आहेत हे त्यांचा निर्णय आहे. आम्ही नाही म्हणत नाही. पण संप सुरू असताना चर्चा होणार नाही. तसेच पगारवाढ दिली असताना संप कायम ठेवत असतील तर पगारवाढी बाबत पण पुन्हा विचार करावा लागेल असा इशारा परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com