Breaking: परमबीर सिंग फरार घोषित
Breaking: परमबीर सिंग फरार घोषितSaam Tv

Breaking: परमबीर सिंग फरार घोषित

परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं कि नाही, यावर सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याविषयी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होते. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचे की नाही यावर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.अखेर किला कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांना न्यायालयने फरार घोषित केले.

गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यावर त्यांनी वाझे प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करण्यात आले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, परमबीर सिंग सध्या गायब झाले आहेत. ते कोर्टात देखील हजर नव्हते. काही दिवसाअगोदर त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, काही प्रत्युत्तर न आल्यामुळे त्यांच्याविरोधामध्ये वॉरन्ट जारी करण्यात आलं.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com