Breaking News : मोठी बातमी! परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Breaking News Parambir Singh
Breaking News Parambir SinghSaam Tv

Breaking News : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकराने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांच्यावर 2021 मध्ये गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचं निलंबन झालं होतं. याविरोधात त्यांनी अपील केली होती. आता या अपीलनुसार त्यांच निलंबन मागे घेण्यात आलं आहे, असं सांगण्यात येत आहे.

Breaking News Parambir Singh
Uday Samant on Uddhav Thackeray: 'ज्यांना नैतिकता नाही ते आता नैतिकतेचे धडे द्यायला लागले', उदय सामंत यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

त्यांचं फक्त निलंबन मागे घेण्यात आले नाही, तर त्यांचा जो निलंबनाचा काळ आहे, तो ते ड्युटीवर असल्याचं गृहीत धरलं जाणार आहे. यामुळे परमबीर सिंह  (Param Bir Singh)  यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

Breaking News Parambir Singh
The Kerala Story : 'द केरला स्टोरी'वर बंदी का? सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला परखड सवाल

परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देखमुख यांना तुरुंगात जावं लागलं

परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याबाबत त्यांनी पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर गृहमंत्र्यांवर देखील कारवाई करण्यात आली होती.

अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्याचवेळी परमबीर सिंह यांचं देखील निलंबन करण्यात आलं होतं. अखेर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com