'परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस', चौकशीत 12 साक्षीदारांनी दिली साक्ष

हे सर्व जबाब कॅमेरासमोर नोंदवण्यात आल्याची सूत्रांची महिती मिळत आहे.
'परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस', चौकशीत 12 साक्षीदारांनी दिली साक्ष
'परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस', चौकशीत 12 साक्षीदारांनी दिली साक्षSaam Tv

सुरज सावंत

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांच्या अडचणी वाढतच आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेच्या चौकशीत 12 साक्षीदारांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिली आहे. त्यामुळे आता सिंग आणखीनच अडकले जाण्याची शक्यता आहे. "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच सचिन वाझेचे 1 नंबर बॉस" असा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर हे सर्व जबाब कॅमेरासमोर नोंदवण्यात आल्याची सूत्रांकडून महिती मिळत आहे.

हे देखील पहा-

दरम्यान परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे Sachin Waze तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची सीआयडी, लाचलुचपत विभाग तसेच गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

'परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस', चौकशीत 12 साक्षीदारांनी दिली साक्ष
Nandurbar: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

परमबीर या़ंच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून Crime Branch करण्यात येत आहे. याच गुन्ह्यात परमबिर सिंह यांना काल (ता.12) चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते मात्र ते यावेळेसही गैरहजर राहिले. तर आता या गुन्ह्यात 12 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, या 12 जणांनी अँटिलिया घटना आणि मनसुख हत्या प्रकरणात Mansukh Hiren Case अटक करण्यात आलेला सचिन वाझे चा नंबर वन बॉस हा परमबीर सिंह होता असे जबाबात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com