परमबीर यांच्या अधिकाऱ्याने एनआयएला सांगितले की...

ज्या अधिकाऱ्याने पैसे दिल्याची कबुली दिली आहे, तो अधिकारी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ परमबीरसोबत काम करत आहे.
परमबीर यांच्या अधिकाऱ्याने एनआयएला सांगितले की...
परमबीर यांच्या अधिकाऱ्याने एनआयएला सांगितले की...

अँटिलिया प्रकरण (Antilia Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) एनआयए'ने (NIA) दाखल केलेल्या याचिकेत, एका सायबर तज्ञाच्या जबाबाने एकच खळबळ उडवून दिली आहे. ज्यात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालात सायबरने कसा बदल केला हे सांगितले. याची खात्री पटवण्यासाठी एनआयएने परमबीर सिंगच्या अगदी जवळच्या एका अधिकाऱ्याचा जबाब आहे. या जबाबात त्याने परमबीर सिंगच्या सांगण्यावरुन सिक्रेट सर्व्हिस फंडातून 5 लाख रुपये सायबर तज्ञाला दिल्याचे कबूल केले आहे.

हे देखील पहा-

ज्या अधिकाऱ्याने पैसे दिल्याची कबुली दिली आहे, तो अधिकारी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ परमबीरसोबत काम करत आहे. तसेच तो सध्या होमगार्ड विभागात कार्यरत आहे, त्याच ठिकाणी परमबीर सिंह देखील डीजी पदावर आहेत. हा अधिकारी 2006 मध्ये एटीएसमध्ये असल्यापासून परमबीर सिंग सोबत आहे.

2006 नंतर, परमबीर सिंह कोकण परिक्षेत्राचे आयजी झाले, नंतर व्हीआयपी सुरक्षा, नंतर एडीजी/एसआरपीएफ, ठाणे पोलीस आयुक्त, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था (महाराष्ट्र) नंतर डीजी एसीबी आणि मग मुंबई पोलीस आयुक्त त्यानंतर डीजी होम गार्ड झाले. त्या़च्या या प्रवासात हा अधिकारीही त्यांच्यासोबत होता.

परमबीर यांच्या अधिकाऱ्याने एनआयएला सांगितले की...
Rajyasabha Election: राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर

त्या अधिकाऱ्याने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तो परमबीर सिंग यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांचे आर्थिक आणि कुटुंबातील सदस्यांशिवाय त्यांच्या कार्यालयीन कामाची काळजी घेत असे, सायबर तज्ञाबाबत प्रश्न विचारले असता, त्याने 3 मार्च रोजी एक व्यक्ती CP च्या चेंबरमध्ये लॅपटॉप घेऊन बसला होता, यावेळी मला त्याच्याबद्दल माहिती नव्हती, पण नंतर कळले की, तो एक सायबर तज्ञ आहे आणि संध्याकाळी 5 च्या सुमारास सिंगने फोन केला मी आत आलो. आणि मला त्या सायबर तज्ञाला 3 लाख रुपये देण्यास सांगितले, त्याच वेळी त्याने तज्ञांना विचारले की तेवढे पैसे पुरेसे आहेत की, मी जास्त द्यायचे, जेव्हा सायबर तज्ञांनी उत्तर दिले नाही, तेव्हा सिंगने मला दोन लाख जास्त देण्यास सांगितले. त्यानुसार मी 5 लाख सायबर तज्ञांला सिक्रेट सर्व्हिस फंडातून काढून दिले.

एनआयएने या अधिकाऱ्याचे दोनदा जबाब नोंदवले, ज्यांच्याकडून पहिला जबाब 24 एप्रिल 2021 रोजी आणि दुसरा जबाब 13 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आला. एनआयएला या अधिकार्यांकडे सिंगचे दोन ईमेल आयडी मिळाले, त्यावेळी एनआयएने या अधिकाऱ्याला परमबीरच्या सध्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता. त्याने ते चंडीगड येथे असण्याची शक्यता व्यक्त केली.

चौकशीत अधिकाऱ्याने एका पोलिस शिपायाला एका व्यक्तीला फोन करून सेकंड हॅड फोन संदर्भात विचारणा केली. एप्रिलच्या दुसऱ्याच आठवड्यात हा शिपाई तीन ते चार मोबाइल घेऊन होमगार्ड कार्यालयात आला होता. अर्धातास तो परमबिर सिंह याच्या चेंबरमध्ये होता.

Edited By- Anuradha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com