निर्दयी : पैशांसाठी आई-बापाने विकली पोटची 3 मुलं; विकलेल्यांपैकी एक बाळ 28 दिवसांचं

पहिली मुलगी 90 हजारांना तर दुसरी मुलगी 2 लाखांना विकली 2 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या मुलांच्या शोध सध्या नवी मुंबई पोलीस घेत आहेत.
निर्दयी : पैशांसाठी आई-बापाने विकली पोटची 3 मुलं; विकलेल्यांपैकी एक बाळ 28 दिवसांचं
निर्दयी : पैशांसाठी आई-बापाने विकली पोटची 3 मुलं; विकलेल्यांपैकी एक बाळ 28 दिवसांचंSaam TV

नवी मुंबई : नेरूळ येथील जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या ३ मुलांची विक्री केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई महिला व बालविकास विभागाने उघडकीस आणली असून या बालकांना विकण्यासाठी आई-वडिलांनी २ लाख ९० हजार रुपये घेतल्याचही उघडकीस आलं आहे.

पहिली मुलगी 90 हजाराला तर दुसरी मुलगी 2लाखांना विकली 2 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या मुलांच्या शोध सध्या नवी मुंबई पोलीस घेत आहेत. नेरूळ रेल्वेस्थानकातील फलाटावर राहणारी ही महिला होती. गरोदर असताना तिने आपल्या बाळाची २ लाखांना विक्री केली. हे बाळ फक्त २८ दिवसांचे आहे.

निर्दयी : पैशांसाठी आई-बापाने विकली पोटची 3 मुलं; विकलेल्यांपैकी एक बाळ 28 दिवसांचं
Sharad Pawar : 'कोल्हेंनी कलाकार म्हणून भूमिका केली'; शरद पवारांचा कोल्हेंना पाठिंबा, पाहा व्हिडीओ

या जोडप्याने २०१९ मध्ये आपली ३ महिन्यांची मुलगी नवी मुंबई मधील NRI परिसरात विकल्याची माहिती तपासात दिली. त्यानुसार ही मुलगी खरेदी करणाऱ्या महिलेचे घर गाठले व ही मुलगी ताब्यात घेण्यात आली. हा व्यवहार ९० हजार रुपयांना झाल्याचे सापडलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झालं.

दरम्यान बाळांची खरेदी व विक्री करणाऱ्या दोघींविरोधात नेरूळ पोलिसांनी (Nerul police) गुन्हा दाखल केला आहे. या मुलीनंतरचा मुलगा आरोपीने कोठे विकला आहे यांच्या शोध सुरू आहे. पोलिसांनी आईला ताब्यात घेतले असून, घटनेची कुणकुण लागताच बाप फरार झाला आहे. आरोपीला शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पथक शोध घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com