मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दिवशी काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील काही भागांमध्ये ३१ मे रोजी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
Parts of Mumbai to Face Water Cut on 1 june
Parts of Mumbai to Face Water Cut on 1 june Saam Tv

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai ) महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील काही भागांमध्ये ३१ मे रोजी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे (BMC ) आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. तर ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ( Mumbai Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मुंबई महापालिकेकडून हे जलवाहिनी जोडण्याचे काम ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. तर १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हे काम संपुष्टात येईल. यामुळे सदर कालावधीत महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व), आर/मध्य विभागातील बोरिवली (पूर्व), आर/उत्तर विभागातील दहिसर (पूर्व) आणि पी/उत्तर विभागातील मालाड (पूर्व) परिसरांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.त्यामुळं या भागातील नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Parts of Mumbai to Face Water Cut on 1 june
आमदारांची नाराजी नको म्हणून राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक

मुंबईतील या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

१) आर/उत्तर विभागः - पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० वाजता - या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल.तर बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

२) आर/मध्य व आर/उत्तर विभागः अ)

ब) ओवरीपाडा (अंशत:) - सकाळी ८.३० ते सकाळी १०.४५ वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

३) आर/मध्य व आर/उत्तर विभागः अ) काजूपाडा (उंच पातळी परिसर)

ब) अशोकवन (उंच पातळी परिसर)- या भागात सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल.तर मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

४) आर/उत्तर विभागः या भागात सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.४० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

५) आर/उत्तर विभागः रात्री ९.३० ते रात्री ११.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

६) आर/मध्य विभागः हनुमान टेकडी पंपिंगचा भाग (काजूपाडा) – पहाटे ४.५० ते सकाळी ६.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. या बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

७) आर/मध्य विभागः पहाटे ४.३० ते सकाळी ६.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

८) आर/दक्षिण विभागः आकुर्ली मार्ग, अशोक नगर – या भागात सकाळी ९.३० ते सकाळी ११.४० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

ठाकूर संकुल, बाणडोंगरी – सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

समता नगर, म्हाडा इमारती – सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

ठाकूर गांव, म्हाडा पुनर्वसन – सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५ वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

जानूपाडा - या भागात ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

सिंग इस्टेट, लक्ष्मी नगर – पहाटे ५.०० ते सकाळी ११.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

बारक्या रामा कंपाऊंड, आझादवाडी – (सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजता या वेळेत नियमित पाणीपुरवठा होईल. तर ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

पंचायत समिती – (पहाटे ५.०० ते सकाळी ११.३० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

रहेजा संकुल – (रात्री ११.३० ते पहाटे ४.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

भीम नगर, गौतम नगर – (२४ तास पाणीपुरवठा) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

हनुमान नगर, नरसीपाडा – (सकाळी ८.०० ते सकाळी १०.३० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

लोखंडवाला म्हाडा – (पहाटे ५.०० ते सकाळी ९.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

लोखंडवाला वसाहत (खालचा भाग) – (सायंकाळी ५.०० ते रात्रो ९.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

लोखंडवाला वसाहत (उच्च भाग) – (रात्री ११.३० ते पहाटे ५.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (दिनांक ३१ मे २०२२ रोजी आणि दिनांक १ जून २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

९) पी/उत्तर विभागः क्रांती नगर खालचा भाग – (पहाटे ५.०० ते सायंकाळी ५.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

अप्पापाडा खालचा भाग – (पहाटे ५.०० ते सायंकाळी ५.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

क्रांती नगर वरचा भाग (झुंजार चाळ, आंबेडकर चौक, भाजी मार्केट मार्ग, वीर हनुमान चाळ, महात्मा फुले चाळ, नटराज चाळ, गणेश चाळ.) – (सायंकाळी ५.०० ते पहाटे ५.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

अप्पा पाडा वरचा भाग (प्रथमेश नगर, महाराष्ट्र नगर, प्रणिता निवास, वनश्री चाळ) – (सायंकाळी ५.०० ते पहाटे ५.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

भीम नगरचा भाग, मंगलकृपा आणि अप्पापाडा, एस. आर. ए. इमारत, आनंदवाडी, शिवाजी नगर, संताजी धनाजी मार्ग, तानाजी नगरचा भाग – (सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com