गुन्हा दाखल होताच भरले वीजचोरीचे देयक; कल्याण पूर्व विभागातील प्रकरण

वीजचोरी उघडकीस आल्यानंतर पुरेसा कालावधी देऊनही चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम न भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांने सोमवारी रकमेचा भरणा केला.
गुन्हा दाखल होताच भरले वीजचोरीचे देयक; कल्याण पूर्व विभागातील प्रकरण
गुन्हा दाखल होताच भरले वीजचोरीचे देयक; कल्याण पूर्व विभागातील प्रकरणप्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण - वीजचोरी उघडकीस आल्यानंतर पुरेसा कालावधी देऊनही चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम न भरणाऱ्याविरुद्ध गुन्हा Crime दाखल झाल्यानंतर संबंधितांने सोमवारी रकमेचा भरणा केला. महावितरणच्या फिरत्या (भरारी) पथकाने मार्च २०२१ मध्ये कल्याण पूर्व विभागात ही कारवाई Action केली होती. Payment of electricity theft paid as soon as the crime is filed

अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक बुंधे Ashok Bundhe यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात सर्व्हे नंबर ३० एचएन १५ ए आणि एचएन १/२ येथील बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली असता वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले.

हे देखील पहा -

मार्च-२०२१ मध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रीतसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व १५ हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय अनंत गायकवाड यांना कळवण्यात आले.

मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता बुंधे यांच्या वतीने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार ३० जून २०२१ रोजी गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल होताच भरले वीजचोरीचे देयक; कल्याण पूर्व विभागातील प्रकरण
अतिक्रमण केलेल्या सरपंच आणि सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे ३४ हजार ८४० रुपयांचे देयक व तडजोडीची १५ हजार रुपयांची रक्कम सोमवारी (१२ जुलै २०२१) महावितरणकडे भरली आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंतचा कारावास व आर्थिक दंड अथवा दोन्हीही शिक्षेची कठोर तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा व अनधिकृत वापर टाळावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com