PDCC Election: अध्यक्षपदी पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे; अधिकृत घोषणा थोड्याच वेळात

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे- पाटील, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते- पाटील, संजय जगताप या महत्वाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.
PDCC Election: अध्यक्षपदी पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे; अधिकृत घोषणा थोड्याच वेळात
PDCC ElectionSaam TV

पुणे: पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली आहे. अध्यक्षपदी जुन्या आणि उपाध्यक्षपदी नव्या चेहेऱ्याला संधी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती होती. त्यामुळे आता बँकेचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याची उत्सुकता होती. आता ते अध्यक्षपद पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे गेले आहे. तर उपध्याक्षपदी मावळचे सुनील चांदेरे यांची निवड झाली आहे. (PDCC Bank Chairman Election today). पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी (PDCC Election) २१ जागांपैकी १४ जागा झाल्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या ७ जागांसाठी निवडणूक झाली.

त्यात १४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. एकूण १२३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे- पाटील, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते- पाटील, संजय जगताप या महत्वाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना मात्र निवडणूक लढवावी लागली होती. त्यात त्यांचाही विजय झाला होता. माजी आमदार रमेश थोरात, आमदार अशोक पवार आणि दिलीप मोहिते पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र आता नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसत आहे. २१ पैकी २० जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक आले होते तर एका जागेवर भाजपचे प्रदिप कंद निवडणूक आले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com