Penguin Tender|पेंग्विन टेंडर मागे घेतलं जाणार नाही; महापौर किशोरी पेडणेकरांची स्पष्टोक्ती!

२०२१ ते २०२२-२३ पर्यंत कुठेही टेंडर मागे घेतलेलं नाही.
Penguin Tender|पेंग्विन टेंडर मागे घेतलं जाणार नाही; महापौर किशोरी पेडणेकरांची स्पष्टोक्ती!
Penguin Tender|पेंग्विन टेंडर मागे घेतलं जाणार नाही; महापौर किशोरी पेडणेकरांची स्पष्टोक्ती!SaamTV

मुंबई : वीर माता जिजाबाई उद्यानातील (Jijabai Udyan) पेंग्विनच्या टेंडर संदर्भात मागील आठवड्यात बरीच चर्चा झाली होती पेंग्विनसाठी मुंबई पालिकेने काढलेल्या टेंडरवरती महाविकास आघाडीमधील घटक असणाऱ्या कॉंग्रेस पक्षानेच आक्षेप घेतला होता दरम्यान हे टेंडर (Penguin Tender) मागे घेण्यात आल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र या चर्चांना आता महापौर (Mayor) किशोरी पेडणेकरांनीच पुर्णविराम दिला आहे.

'पेंग्निनच टेंडर मागे घेतलं जाणार नाही, तसेच त्यात काही बदल केलं जाणार नाही' २०२१ ते २२-२३ पर्यंत कुठेही टेंडर मागे घेतल नाही. १०% वाढ करून टेंडर आलेलं आहे, कोर्टाने (Court) देखील या टेंडरच कौतुक केलं आहे. तसेच १५ कोटींच टेंडर ३ वर्षासाठी करण्यात आलं आहे. बाहेरून आणलेले हे पक्षी आहेत त्यामुळे त्यांच्यावर खर्च होतोय, तो होणारच त्यात आपण बदल करू शकत नाही.' अशी टेंडर बाबतची स्पष्टोक्तीच किशोरी पेडणेंकर (Kishori Pedenkar) यांनी दिली. (Penguin tender will not withdraw)

एक गुड न्यूज आहे.

२०२० चं उत्पन्न ५ कोटी ६७ लाख उत्पन्न झाल होतं टेंडर मागे घेतलेल नाही, रिव्हेऊ वाढलाय देशातील लोक पाहायला येतात या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा एक गुड न्यूज (GoodNews) आहे दोन जोड्या आहेत, डोनाल्ड (Donald) आणि देसीला ओरिओ नावाच बाळ झालं आहे. आता तो मोठा झालाय तसेच किशोर वयातील आवरण 1 वर्षापर्यंत राहील, मग तो प्रौढ होईल डोनाल्ड आणि डेसी (Daisy) ला हा ओरिओ नावाचं बाळ झालंय डॉक्टरांनी सगळी काळजी घेतली होती पण तेव्हा बबल नावाची एकच मादी एकटी होती. आता ही बबल, ओरिओ (Bubble, Orio) ला सांभाळतेय तसेच मोल आणि प्लिपर या पेंग्विन जोडीला देखील एक बाळ झालं असल्याची माहितीही पेडणेकरांनी दिली.

Penguin Tender|पेंग्विन टेंडर मागे घेतलं जाणार नाही; महापौर किशोरी पेडणेकरांची स्पष्टोक्ती!
दहशतवाद्यांच्या रडारावर मुंबई; गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राणीबागेवर शॉर्ट फिल्म

राणीबाग (Ranibagh) सध्या पर्यटकांसाठी बंद आहे पण प्राण्यांची सगळी सुश्रुषा केली जातेय राणी बाग सुरू करण्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील राणी बागेत काय काय आहे , या सगळ्यावर एक शॉर्ट फिल्म आम्ही तयार करतोय , या शॉर्टफिल्म (Short Film) मध्ये राणी बागेची सगळी माहिती, देण्यात येणार आहे असही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान काही लोकांना राजकारण करायचं आहे त्यांना खुशाल करुद्यात मात्र पेंग्विन पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात आणि त्यातूनच उत्पन्नात देखील वाढ होतं आहे. न्यायालयाने देखील पालिकेच कौतुक केलं आहे असंही महापौर म्हणाल्या.

Edited By - Jagdish

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com