किरीट सोमय्यांना कायमची प्रवेश बंदी; कागल मधील नगरपालिकेत ठराव मंजूर!

किरीट सोमय्यांनी कोल्हापूरला येवू नये अन्यथा कोल्हापूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थीत राहू शकतो
किरीट सोमय्यांना कायमची प्रवेश बंदी; कागल मधील नगरपालिकेत ठराव मंजूर!
किरीट सोमय्यांना कायमची प्रवेश बंदी; कागल मधील नगरपालिकेत ठराव मंजूर!Saam Tv

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असणारा किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ (Kirit Somaiya vs Hasan Mushrif) यांच्यामधील वाद काही केल्या कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी (MVA Leader) मधील अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांनी याची लिस्ट देखील प्रसारीत केली होती. मात्र या सगळ्यामध्ये जास्त चर्चा झाली ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती केलेल्या १२७ कोटी घोटाळ्याची आणि नुकत्याच कोल्हापूर दौऱ्यावरुन (Kolhapur tour) झालेल्या सोमय्यांच्या 'हाय व्होल्टेज ड्राम्याची'. (Permanent entry ban on Kirit Somaiya; Resolution passed in Kagal municipality)

किरीट सोमय्यांनी कोल्हापूरला येवू नये अन्यथा कोल्हापूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थीत राहू शकतो, कारण मुश्रीफ यांच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मुंबईहून (Mumbai) आलेल्या सोमय्यांना कराड (Karad) मधूनच मागे फिरावे लागले होते मात्र 'मी पुन्हा येईन' चा निर्धार करुनच मागे फिरलेले सोमय्या २८ तारखेला पुन्हा कोल्हापूर दौर्यावरती पुन्हा येणार असतानाच आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेत (Murgud Municipalit) आज किरीट सोमय्यांना कायमची प्रवेशबंदी (No entry) करण्याचा ठराव पास केला आहे. याची माहिती स्वत: सोमय्या यांनी आपल्या ट्विटर (Twitter) वरुन दिली आहे तसेच या निर्णयाचे मी स्वागत करत असल्याचेही ते ट्विटरमध्ये म्हणाले आहेत.

"आत्ता ठाकरे सरकारची मुरगूड कागल नगरपालिका नी ठराव केला की " किरीट सोमैया ना मुरगूड कागल येथे प्रवेश नाही" मी याचे स्वागत करीत आहे." अशा स्वरुपाचे ते ट्विट त्यांनी केले आहे.

सोमय्या हे २८ तारखेला मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये (Murgud police station) मुश्रीफांच्या घोटाळ्याबाबत फिर्याद देणार आहेत आत्र आता मुरगूड मध्ये येण्यासच बंदीचा ठराव केल्याने २८ तारखेला काय होणार याबाबतची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. याबरोबरच सोमय्या यांनी चिथावणीखोर भाषा वापरत कोल्हापुरामधील वातावरण अशांत करू नये, अन्यथा त्यांच्या मुंबई येथील घरावर मोर्चा काढू, असा इशारा कोल्हापूर (Kolhapur) शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या (City and district all-party action) वतीने देण्यात आला आहे. दरम्यान हसन मुश्रीफ कोल्हापुरमध्ये त्यांच्यावरील आरोपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com