Breaking: भोंगे, स्पीकरबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भोंग्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Permission Of Loudspeekar
Permission Of LoudspeekarSaam Tv

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावर सरकारला इशारा दिला आहे. यानंतर आता राज्यातील वातावरण तापले आहे. आता गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. भोंग्याबाबत सर्व मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता भोंगे लावण्याअगोदर स्थानिक प्रशासकीय परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Permission Of Loudspeekar
Raj Thackeray : राज ठाकरे यांची पुण्यात १२ वाजता पत्रकार परिषद

भोंग्याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा पोलीस (Police) प्रमुख व अधिकाऱ्यांची पोलीस संचालक बैठक घेणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागू नयेत यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे आता सर्व धर्मियांना भोंगा किंवा लाऊडस्पिकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळा्यामुध्ये भोंग्यांचा मुद्दा उपस्थीत करुन राज्य सरकारला ३ मे पर्यंत इशारा दिला होता. यावरुन आता राज्यातील वातावरण तापले आहे. गृह विभागाने आदेश काढून भोंग्याबाबत परवानगीचा निर्णय घेतला आहे.

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; 3 मे पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई

राज्यामध्ये मशिदीवर भोंग्याचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिकमधील (Nashik) ३ मे पर्यंत मशीदच नव्हे, तर सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. यानंतर पोलिसांकडून (police) कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त (Commissioner) दीपक पांडे यांच्या या आदेशाची आता चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या १०० मीटर परिसरामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही. शिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे.

नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावर भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत मशीदच नव्हे, तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या (Religious place) भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यानंतर जर ३ मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाविषयी सर्वोच्च न्यायलयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे (State Government) आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे.

Edited By- Santosh Kanmsue

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com