पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकले

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकल्याची घटना घडली
पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकले
पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकलेSaam Tv

पुणे : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या Satara district central पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी तवानी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये Pimpri Chinchwad भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप BJP MLA यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात दुचाकीस्वाराने रॉकेल बॉम्ब फेकून पळ काढला आहे. शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या चंद्ररंग कार्यलयाच्या दिशेने हे रॉकेल बॉम्ब फेकले गेले आहे. एका मोपेडवर आलेल्या ३ तरुणांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकले आहे. एकूण २ बॉम्ब फेकण्यात आले होते.

पिंपरीमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्ब फेकले
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक; कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी

रॉकेल बॉम्ब कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर पडले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सांगवी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण माहिती घेऊन हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले होते. परंतु, ४ हल्लेखोरांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरामधील १ हल्लेखोर हा सांगवीचा स्थानिक आहे. तर इतर ३ जण आरोपी हा पिंपळे गुरव तेथील सुदर्शन नगर मध्ये राहणार असून उर्वरित ३ आरोपी हे कासारवाडी मध्ये राहणारे आहेत. या घटनेतील आरोपी हे २ सज्ञान आणि २ अल्पवयीन आरोपींनचा रॉकेल बॉम्ब हल्ल्यात सहभाग आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com