Pune Crime News: पिंपरी-चिंचवड हादरले! महिलेने लग्नास नकार दिल्याचा राग; तरुणाने चिमुकल्यासोबत केले भयंकर कृत्य

Pune Crime Update: दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे...
Pimpari Chinchwad Police
Pimpari Chinchwad PoliceSaamtv

Pimpari Chinchwad News: महिलेने लग्नास नकार दिल्याने एका माथेफिरू व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या सव्वा वर्षाच्या मुलास गरम पाण्यात बुडवून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Pimpari Chinchwad Police
Operation Kaveri : सुदानमध्ये 'ऑपरेशन कावेरी' सुरू, 500 भारतीयांना सुखरूप बाहेर काढलं

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील मुख्य आरोपी विक्रम शरद कोळेकर याने संबंधित महिलेला लग्नाची मागणी घातली होती. यावेळी महिलेने नकार दिल्याच्या रागात तिच्या सव्वा वर्षाच्या मुलास गरम पाण्यात बुडवून गंभीर जखमी केले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते.

मात्र उपचारादरम्यान, या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन पथकाकडून विक्रम शरद कोळेकर या आरोपीला फक्त 24 तासात ताब्यांत घेण्यात आले आहे.

Pimpari Chinchwad Police
Kalyan News : बिल्डिंग 3 मजल्याची अन् नोटीस चौथ्या पाचव्या मजल्याला नोटीस, मालकही चक्रावले; KDMCचा अजब कारभार

दरम्यान, गुन्हा केल्यानंतर विक्रम शरद कोळेकर हा फरार झाला होता. मात्र गुन्हे शाखा पोलीस पथकाने विक्रम शरद कोळेकर याला चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील बहुळ परिसरातून ताब्यात घेतलं असून, त्याच्या विरोधात चाकण (Chakan) पोलीस स्टेशन मध्ये मादवी 302, 305 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com