Pune Crime News : लॉजवर सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांनी टाकली धाड अन्...

सामाजिक सुरक्षा पथकाने ऑनलाइन सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv

पिंपरी चिंचवड : वेशा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग घेऊन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रॅकेटचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला. वाकडंच्या रांजना लॉजवर धाड टाकून सामाजिक सुरक्षा पथकाने ऑनलाइन सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून यामधील दोन आरोपींना अटक केली आहे. (Pimapari Chichwad Todays News)

Pune Crime News
Latur News : बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याला राग अनावर; सासूसोबत केलं भयंकर कृत्य

सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील तीन मुलींची सुटका केली आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीनही मुली ह्या पश्चिम बंगालतील सिलीगुडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रॉनी बच्चालाल भारती, अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर आणि वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले या तीन आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Pimapari Chichwad Crime News)

Pune Crime News
म्हशीसमोर नाचणं तरुणीला पडलं महागात; नक्की काय घडलं? पाहा VIDEO

गुन्हा दाखल केल्या नंतर सामाजिक सुरक्षा पथकाने वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले आणि राणी बच्चनलाल भारती या दोन आरोपीला अटक केली आहे. तर अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर हा आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com