पिंपरी - चिंचवडमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड
पिंपरी - चिंचवडमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआडSaam Tv

पिंपरी - चिंचवडमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड

टोळीकडून दोन हजार रुपयांच्या जवळपास 1222 बनावट चलनी नोटा निगडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पुणे: पिंपरी - चिंचवड (PCMC) पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीकडून दोन हजार रुपयांच्या जवळपास 1222 बनावट चलनी नोटा निगडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बनावट नोटा तयार करणारे गोरख दत्तात्रय पवार आणि विठ्ठल गजानन शेवाळे या दोन आरोपींना निगडी पोलिसांनी सापळा लावून अटक केली आहे. 

गोरख पवार हा आरोपी निगडीच्या ओटास्कीम परिसरात बनावट चलनी नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती निगडी पोलिसांना मिळाली, त्याआधारे निगडी पोलिसांनी सापळा लावून गोरख पवार आणि विठ्ठल शेवाळे या दोन आरोपींना अटक केली आहे

या आरोपीच्या ताब्यातून 32 लाख 67 हजार रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटा, एक लॅपटॉप, एक प्रिंटर आणि एक दुचाकी गाडी असा एकूण 33 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल निगडी पोलिसांनी जप्त केला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com