Pimpri Chinchwad : डॉक्टर बनले महिलेसाठी देवदूत; पहिल्यांदाच हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी

पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्यांदाच डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हृदय आणि फुफ्फुस एकाच वेळी यशस्वी रित्या प्रत्यारोपण केल्याचा दावा डी वाय पाटील मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटीने केला आहे.
 heart -lung transplant
heart -lung transplant saam tv

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड (Pimpri) शहरामध्ये पहिल्यांदाच डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हृदय आणि फुफ्फुस एकाच वेळी यशस्वीरित्या प्रत्यारोपण केल्याचा दावा डी वाय पाटील मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटीने केला आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदाच ह्रदय आणि फुफ्फुसाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण (Transplant) करण्यात आल्याचा दावा देखील डी वाय पाटील युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजने केला आहे. (heart -lung transplant surgery)

 heart -lung transplant
Wardha: विनाकारण साखळी ओढणे पडले महागात; नऊ महिन्यांत १०५ प्रकरण दाखल

प्राजक्ता नावाच्या महिलेचे एल ए एम या आजाराने (illness) हृदय आणि फुफ्फुस निकामी झाले होते. जवळपास 11 वर्ष सतत ऑक्सिजन सिलेंडर लावून त्या कशाबशा जगत होत्या. मात्र त्या महिलेचे योग्य वेळी हृदय आणि फुफ्फुस दान मिळाल्याने त्यांना जीवदान मिळालं आहे. प्राजक्ता यांना हृदय आणि फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यासाठी जवळपास 37 ते 38 लाख रुपये खर्च आला आहे. हा खर्च देखील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज ने ना नफा - ना तोटावर या तत्त्वावर केला आहे.

 heart -lung transplant
Devendra Fadnavis: PFI हा एक सायलेंट किलर; केंद्रानं बंदी घातल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

पिंपरी चिंचवड सारख्या छोट्या शहरात हृदय आणि खूपच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्याने पिंपरी चिंचवड करात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात देखील एखाद्या गरजू रुग्णाला ना नफा ना तोटा या तत्त्वावर मानवी अवयव प्रत्यारोपण करण्यात येतील, असे यावेळी डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे कुलपती पाटील यांनी सांगितलं.

तसेच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करणारे समूहाचे मुख्य डॉक्टर संदीप अटावार यांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अवयव दानाविषयी अजून जागरूकता निर्माण व्हायला हवी. त्यांनी ब्रेनडेड रुग्णांचे अवयव दान करून एखादा गरजू रुग्णाला नवीन जीवन द्यायला हवं, असं आव्हान यावेळी केलं. तर प्राजक्ता यांना डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये नवीन जीवन मिळाल्याने तिने देखील देवाप्रमाणे डी वाय पाटील मेडिकल कॉलेजविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com