देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावले अवैध धंदे; पोलिसांची मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट!

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पिंपरी - चिंचवड पोलिसांचा अजब कारभार पाहायला मिळत आहे.
crime news
crime newssaam tv

पुणे - राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पिंपरी - चिंचवड पोलिसांचा (Police) अजब कारभार पाहायला मिळत आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे काम पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलीस करत आहेत. शाळेच्या गणवेशात अवैध देशी हतभटी दारू विक्री करत असलेल्या विद्यार्थिनीचे स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे देहू रोड पोलीसांनी एका सामाजिक कार्यकर्त्यांवर आणि न्यूज व्हायरल करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात चक्क गंभिर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या देहूरोड पोलिसांनी चक्क स्टिंग ऑपरेशन करणारा सामाजिक कार्यकर्ता तसेच त्या स्टिंग ऑपरेशनची न्यूज व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारू विक्री करणाऱ्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ता श्रीजीत रमेशन आणि याच्यासह आणखी एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला इसम इतर कोणी नसून एक स्थानिक पत्रकार असलयाचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा -

पोलीस या प्रकरणात अजूनही काही पत्रकारांना आरोपी करण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलीस सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना आरोपी करत असताना चक्क अवैध दारू विक्री करणाऱ्या कुटुंबाला पाठीशी घालत आहेत. जणू देहू रोड पोलिसांनी त्या कुटुंबाला अवैध दारू विक्री करण्याचा परवानाच दिला की काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

crime news
Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीतून मोठा दिलासा! जाणून घ्या आजचे दर

अवैध दारू विकणाऱ्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते आणि एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जो कुटुंब त्या अल्पवयीन विद्यार्थी कडून अवैध दारू विक्री करत होता, त्यांच्यावर देहू रोड पोलीसांनी मात्र साधी कारवाई देखील केली नाही. त्यामुळे पोलीस अवैध धंद्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवर कारवाई करून पत्रकारांच खच्चीकरण करण्याचा काम करत आहेत का? असा प्रश्न देखील या गुन्ह्या मुळे उपस्थित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com