Pune : "अजित पवार तुम्ही आमचं ऐका नाहीतर गडबड होईल" पहा Video

मात्र आघाडी धर्म निभावताना तुम्ही सोबत आले तर ठीक, नाहीतर तुमच्या शिवाय...! महापालिका निवडणुकीत आघाडी सन्मानाने व्हावी अशी आमची इच्छा आहे.
Pune : "अजित पवार तुम्ही आमचं ऐका नाहीतर गडबड होईल" पहा Video
Pune : "अजित पवार तुम्ही आमचं ऐका नाहीतर गडबड होईल" पहा VideoSaamTvNews

पिंपरी चिंचवड : राज्यातील महाविकस आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचा प्रत्यय नेहमी येत असतो. सत्तेत असून देखील तिन्ही पक्षातील खदखद नेहमीच राजकीय आरोप प्रत्यारोप यामधून पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आज देखील पुन्हा एकदा आला आहे. पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथे शिवसेनेच्या मार्गदर्शन मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बोलण्याचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होता. "अजित पवार तुम्ही आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल..!" असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटक पक्षातील खासकरून शिवसेनेतील नेतेमंडळी तसेच कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत नसावेत, त्यामुळेच संजय राऊत यांना आज हे वक्तव्य करावं लागलंय.  मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड या महाराष्ट्रातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या, आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता संजय राऊत यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात येऊन संजय राऊत यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला.

Pune : "अजित पवार तुम्ही आमचं ऐका नाहीतर गडबड होईल" पहा Video
Special | चक्क सुपारीवर साकारलं बाप्पा अन आंबाबाईचं चित्र!

आपल्याला एकटे लढण्याची सवय आहे, मात्र आघाडी धर्म निभावताना तुम्ही सोबत आले तर ठीक, नाहीतर तुमच्या शिवाय...! महापालिका निवडणुकीत आघाडी सन्मानाने व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, हे करत असताना भगव्याच्या स्वाभिमानाशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही असं सूचक वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवताना तीनही पक्षातील नेत्यांना अतिशय तारेवरची कसरत करावी लागते. त्यात आपल्या पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी महाविकास आघाडीतील राजकीय नेते मंडळी अशी वक्तव्य करतात का? की खरंच महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com