भक्ती-शक्ती पुलावरील अपघातग्रस्त युवकाचा रुग्णालयात झाला मृत्यू

भक्ती-शक्ती पुलावरील अपघातग्रस्त युवकाचा रुग्णालयात झाला मृत्यू
omkar khade

पिंपरी-चिंचवड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती पुलावर रविवारी झालेल्या अपघातामधील जखमी ओमकार शिवाजी खाडे omkar khade याचा आज (मंगळवार) एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. (pimpri-chinchwad-youth-died-saint-tukaram-maharaj-bhakti-shakti-bridge)

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 98 कोटी खर्च करून भक्ती-शक्ती चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती पुल बांधला आहे. या पुलाचे नुकतेच उदघाटन झाले हाेते. या पुलावरुन वाहतुक सुरळीत सुरु हाेती. रविवारी एक मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तिघे जखमी झाले हाेते. त्यातील एकाचा आज (मंगळवार) मृत्यू झाला.

omkar khade
सांगलीत आमिर खानला अटक; रेमडेसिव्हरचा काळाबाजार भाेवला

रविवारी निगडी वरून ओमकार खाडे हा युवक देहु रोडच्या दिशेने जात होता. त्याच्यामागे एका दुचाकी हाेती. एका मालवाहू ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात दोन दुचाकीसह तीन युवक जखमी झाले होते.

यामध्ये दोन मुले पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या अपघातामधील ओमकार खाडे याला खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज (मंगळवार) त्याचा मृत्यू झाला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com