Mumbai : मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार; PM मोदी करणार 'या' मेट्रो मार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वेळापत्रक

'मुंबई मेट्रो 2 ए' आणि 'मेट्रो 7' या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे.
Mumbai News
Mumbai News Saam Tv

संजय गडदे

Mumbai News : 'मुंबई मेट्रो 2 ए' आणि 'मेट्रो 7' या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजल्यापासून मुंबईकरांना ही मेट्रो सेवा खुली केली जाणार असल्याची घोषणा आज MMRDA चे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांनी केली. (Latest Marathi News)

या मार्गावर पहिली मेट्रो पहाटे 5.55 वाजता सुटेल तर रात्री 21.24 वाजता शेवटची मेट्रो सुटणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मेट्रो संपूर्णपणे मेड इन इंडिया असून चालकरहित असणार आहे.

Mumbai News
Aditya Thackeray: मुंबई महापालिकेत 6000 कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो सात मार्गिकेच्या गुंदवली स्थानकात जाऊन मेट्रोची पाहणी केली होती, त्यानंतर आज पुन्हा एम एम आर डी ए चे आयुक्त एस श्रीनिवासन यांनी देखील अंधेरी पश्चिमेकडील मेट्रो दोन च्या गुंदावली पश्चिम स्थानकाची पाहणी केली.

दरम्यान, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांद्वारे रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग सिस्टीम, सिव्हिल वर्क्स, ट्रॅक आणि स्पीड ट्रायलची चाचणी पूर्ण झाली आहे. मेट्रो रेल्वे सिस्टीमच्या सार्वजनिक वापरासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र एमएमआरडीएला मिळाले आहे. त्यामुळे मेट्रो 2अ आणि 7 चा दुसरा टप्पा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mumbai News
Atul Londhe on Satyajeet Tambe : "त्यांच्या कुटुंबामध्ये काय झालं माहित नाही", अतुल लोंढे | SAAM TV

पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 19 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com