
Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी मुंबईमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या एकदिवसीय दौऱ्यामुळे आर्थिक राजधानी मुंबईतील अनेक भागात वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. यादरम्यान ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि अनेक योजनांची पायाभरणी करणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) या भेटीबाबत, मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले की, "१९ जानेवारी रोजी दक्षिणेकडील रस्त्यावर सायंकाळी ४.१५ ते ५.३० या वेळेत, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर संध्याकाळी ५.३० ते ६.४५ या वेळेत वाहतूक मंद होऊ शकते. उत्तरेकडील वाहतूकीवर परिणाम होऊ शकतो."
ड्रोनसह विविध उड्डाणांवर बंदी..
पंतप्रधान मोदींच्या गुरुवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्व प्रकारच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स आणि रिमोटली ऑपरेटेड लाईट एअरक्राफ्टचा समावेश आहे. वृत्तानुसार, BKC, अंधेरी, मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी 12 ते मध्यरात्री 12 पर्यंत ही बंदी करण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रोला (Mumbai Metro) नवी गती मिळणार आहे. यादरम्यान मोदी मुंबई मेट्रो लाइन 2A आणि लाइन 7 चे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.