पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वीच पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु
पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) हे आज पुणे (pune) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाै-या निमित्त संपुर्ण जिल्ह्यातील पाेलीस सतर्क झाले आहेत. पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथे पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. (PM Narendra Modi visit to Dehu)
जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते पार पडणार आहे. देहूतील (dehu) मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्यात येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाेलीस यंत्रणा सतर्क आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान मारुती भापकर यांनी कोणतही आंदोलन करु नये म्हणून त्यांना आज सकाळीच पिंपरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दळवी नगर भागातील रेल्वे लाईन ग्रस्त लोकांच्या पुनर्वसन मागणीसाठी मारुती भापकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा दरम्यान आंदोलन करणार होते. दरम्यान लोकशाहीत मला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तरी पोलीस मला आंदोलन करू देत नसल्याने मारुती भापकर यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये लाक्षणिक आंदोलन सुरू केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.