Pune News : ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा पुन्हा सुरू होणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत
Chandrakant Patil
Chandrakant Patil saam Tv

Pune News : एसटी महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने घेतला होता. मात्र ही बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Chandrakant Patil
Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

कोरोना (Corona) काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर एसटी महामंडळाची देखील बससेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करावी; आणि आपला उत्पनाचा स्त्रोत पुन्हा देण्याची विनंती पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली होती.

Chandrakant Patil
Colombia Landslide : कोलंबियात भूस्खलन होऊन ३३ जण ठार तर अनेक जण जखमी; तीन दिवसांनंतरही मृतदेह काढण्याचे काम सुरु

त्यानंतर सदर पत्राच्या अनुषंगाने पीएमपीएमएल प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.‌ प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती‌. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

त्याची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बोकोरिया यांना आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com