Pune PMPML News:पुण्यात ११ मार्गांवर पीएमपीएमएल बस सेवा होणार कायम बंद; ग्रामीण भागातील नागरीकांचा वाढणार त्रास

मार्गांवर बस सेवा बंद केल्याने पिंपरी चिंचवडमध्ये जास्तीच्या बस सेवा पुरवल्या जाणार आहेत.
Pune PMPML
Pune PMPML Saam TV

Pune PMPML News:पुण्यातील (Pune) ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ग्रामीण भागातील वाहतुकीविषयी पीएमपीएमएलकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या २६ नोव्हेंबर पासून या भागातील ११ मार्गावरील पीएमपीएमएल बस सेवा बंद करण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात सुरू असलेल्या वाहतुकीमध्ये कमी उत्पन्न होत असल्याचे पीएमपीएलचे म्हणने आहे. याच कारणामुळे ११ मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पीएमपीएमएल मार्फत सांगण्यात आले आहे. या मार्गांवर बस सेवा बंद केल्याने पिंपरी चिंचवडमध्ये जास्तीच्या बस सेवा पुरवल्या जाणार आहेत.

Pune PMPML
Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत वाद, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

अशात पीएमपीएमएलने ( PMPML ) घेतलेल्या या निर्णयाचा काही ग्रमीण नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात रोजचा प्रवास करणाऱ्या तुरळक व्यक्ती आहेत. त्यामुळे बस सेवाचा पर्याय बंद केल्याने या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

Pune PMPML
Pune News : पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांना PMPML चा दणका, फ्री प्रवास आजपासून बंद

पीएमपीएमएल बस सेवा या ११ मार्गांवर होणार बंद

  • मार्केटयार्ड ते खारावडे

  • कापूरहोळ ते सासवड

  • स्वारगेट ते काशिंगगाव

  • चाकण ते शिक्रापूर फाटा

  • सासवड ते यवत

  • कात्रज ते विंझर

  • हडपसर ते जेजुरी

  • वाघोली ते राहूगाव, पारगाव

  • स्वारगेट ते बेलावडे

  • सासवड ते उरुळी कांचन

  • हडपसर ते मोरगाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com