Pune News: पीएमटीची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

आकाश विल्सन पिल्ले असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Pune Accidental News
Pune Accidental NewsSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

विश्रांतवाडी : पीएमटीने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना डेक्कन कॉलेजजवळ घडली आहे. आकाश विल्सन पिल्ले लय ३१, रा. येरवडा गाडीतळ असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमटी बस (PMT Bus) चालक अजय कामठे (रा. उरळी कांचन ) याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

हा अपघात (Accident) डेक्कन कॉलेज जवळील चंद्रमा चौकात मंगळवारी रात्री झाला आहे. पीएमटी बस MH 12, RN 9076 ही आळंदीहून स्वारगेटला जात होती. याच दरम्यान, दुचाकी वरून आकाश जात असताना पीएमटीने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.

Pune Accidental News
Melghat Accident : मेळघाटात भीषण अपघात; एक ठार, १५ गंभीर जखमी

त्याला उपाचारासाठी ससून रुग्णालयात नेले असता उपचार सुरु असताना तो मृत झाला. मयत आकाश हा विवाहित आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून बस चालक अजय कामठे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, पुण्यातील विश्रांतवाडी भागात असणाऱ्या शांतीनगर येथे युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आकाश अशोक क्षीरसागर (वय २४, रा. शांतीनगर, येरवडा, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश व त्याचे दोन मित्र मुठा नदी पात्रात पोहत होते. आकाशला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडला असल्याची माहिती मिळाली आहे.

पाहा व्हिडीओ -

काल दुपारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. तेव्हा त्याच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने अग्निशामक दल व पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यानंतर आकाशचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीच्या बाहेर काढण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com