PNBच्या ग्राहकांना खात्यात किमान शिल्लक रक्कम दुप्पट ठेवण्याचे बंधन

पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात खात्यात किमान दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे आणि तसे न केल्यास ६०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
Punjab National Bank
Punjab National BankSaam Tv

पुणे - पंजाब नॅशनल बँकेने १५ जानेवारी पासून ठेवीदारांच्या सेवाशुल्कात २५-५० टक्के वाढ केलीच आहे. पण मोठ्या शहरांमध्ये खात्यात किमान शिल्लक रक्कम दुप्पट ठेवण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे पुणे (Pune) मुंबई (Mumbai) सारख्या मोठ्या शहरात खात्यात किमान दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे आणि तसे न केल्यास ६०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. (Punjab National Bank Latest News)

हे देखील पहा -

एकीकडे ठेवीदारांना 600 रुपये दंड लावताना बँकेने दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांत पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) १०० कोटींच्या वर कर्ज थकबाकी असणाऱ्या १४८ थकबाकीदारांची ४६,१२५ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केली असून आजवर त्यातील फक्त ४,५१६ (१० % हून कमी) कोटी रुपयांची वसुली बॅंक करु शकली आहे.

Punjab National Bank
Sanjay Raut: शिवसेना भाजपच्या 'नोटांना' पुरून उरेल; संजय राऊतांचे खुले आव्हान

रिझर्व्ह बॅंकेच्या परीपत्रकानुसार बॅंकेला खात्यात किमान शिल्लक नसल्यास फिक्स्ड पेनलटी लावता येत नाही, तर पेनल्टीच्या स्लॅब कराव्या लागतात आणि किमान शिल्लकीच्या रकमेच्या नियमापेक्षा जितकी रक्कम कमी पडली त्या प्रमाणातच दंड आकारता येतो आणि त्यासाठी सुध्दा ग्राहकाला खात्यातील शिल्लक कमी झाल्याचे कळवल्यानंतर एक महिन्यात त्याला खात्यातील शिल्लक किमान पातळीवर आणण्यात अपयश आल्यास बँक दंड आकारू शकते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com