मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना विषबाधा
मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना विषबाधाSaam Tv

मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना विषबाधा

बाधित रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

पवनानगर - भडवली गावात काकडा आरती समाप्ती काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ग्रामस्थांसाठी जेवनाची सोय करण्यात आली होती. या जवनातून जवळपास ४५ नागरीकांना विषबाधा Poisoning झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाप्रसादाचे जेवण झाल्यानंतर भाविकांना उलट्या, जुलाब आणि डोकेदुखाची त्रास व्हायला लागला.

हे देखील पहा -

बाधित रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा देखील समावेश आहे. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पाठविण्यात आले आहे.

मावळ तालुक्यात ४५ नागरिकांना विषबाधा
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल लोणीकरांचं वादग्रस्त विधान

भडवली गावात जवळपास सर्वच घरातील कोणी ना कोणी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल असून यामुळे गावात शांतात दिसत आहे. सध्या स्थानिक डॉक्टर सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. परंतू या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com