Mumbai: अवैधरित्या मद्याची वाहतूक; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 62 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

एकूण 62 लाख 68 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Mumbai
Mumbaiदिलीप कांबळे

दिलीप कांबळे

Mumbai: पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरून विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे.शुक्रवारी ऊर्से गावच्या हद्दीत उर्से टोल नाक्यावर सापळा रचून गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्री करता असलेल्या विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणारा एक कंटेनर जप्त करून ही कारवाई करण्यात आली. (Latest Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू मिळून आली. या कारवाईत सुमारे 47 लाख 52 हजार रुपये किंमतीची विदेशी दारू आणि कंटेनर असा एकूण 62 लाख 68 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गामीत सोमवेल भाई सिंगाभाई आणि मोहन दिनराम खथात या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.

Mumbai
Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; अवैधरित्या राहणाऱ्या तीन बांग्लादेशी नागरिकांना केली अटक

पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे प्रकार सातत्याने सुरू होते. पोलिसांना आधी या बाबात टीप मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून हा कंटेनर आणि आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेत एकूण 47 लाख 52 हजार किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com