
वसई/विरार : शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे (bahujan vikas aghadi) माजी नगरसेवक अरुण जाधव (arun jadhav) यांना तुळींज पोलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. जाधव यांना न्यायालयात (court) हजर केले असता त्यांना साेमवार पर्यंत पाेलीस काेठडी (police custody) सुनाविण्यात आली आहे. (vasai virar latest marathi news)
खोटे दस्तावेज वापरून शासनाची कोणतीही परवानगी न घेता मौजे तुळींज येथे पार्वती धाम नावाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी ही (एमआरटीपी अंतर्गत) अटकेची कारवाई केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.
गुरुवारी रात्री पोलीस अरुण जाधवच्या घरी अटक करण्यासाठी गेले हाेते. प्रथम त्याने पोलिसांना चकवा देत आपण घरात नसल्याचा कांगावा केला. घरातील दिवे बंद करून स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडायची तयारी केल्यानंतर जाधव पाेलीसांना शरण आला. जाधव यास वसई सत्र न्यायालयाने (vasai court) सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.