राहूल वाडेकर खूनप्रकरणी मिलिंद जगदाळेस अटक

राहूल वाडेकर खूनप्रकरणी मिलिंद जगदाळेस अटक
Rahul Wadekar

राजगुरुनगर : राजगुरुनगर शहरात लेकीच्या भेटीला आलेल्या कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकार rahul wadekar याची नुकतीच हत्या झाली होती. ही घटना राजगुरुनगर येथील पाबळ रोडवर घडली हाेती. या घटनेनंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या घटनेतील मुख्य संशयित मिलिंद जगदाळेसह दाेघांना आज (मंगळवार) अटक केली. या घटनेत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्हेगारीच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत मिलिंद जगदाळेसह दोघांना अटक केली आहे. (police-arrested-dilip-jagdale-in-rahul-wadekar-case-rajgurunagar)

राजगुरुनगर शहरात तरुणवर्ग गुन्हेगारीकडे वळण घेत असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

राहूल हा तडीपार असताना ताे मध्यरात्री राजगुरुनगर शहरात प्रवेश करीत हाेता. त्यावेळेस त्याच्यावर हल्ला झाला हाेता.

जुन्या गुन्हेगारीच्या वादातुन राहूलवर गाेळीबार झाल्याची प्राथमिक माहिती व अंदाज राजगुरुनगर पोलिसांनी व्यक्त केला हाेता. या घटनेचा तपासासाठी पाेलिसांनी चक्रे गतीमान केली हाेती. वर्चस्वसाठी गुंडांच्या टाेळ्या पुन्हा राजगुरुनगरला सक्रिय झाल्या की काय असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला हाेता.

या घटनेतील मुख्य संशयितासह दाेघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य तिघा संशयितांचा पाेलिस शाेध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com