Crime News: पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चाैघांना शस्त्रांसह अटक

या टोळीने अन्य ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची माहिती पाेलीसांना दिली.
Crime News: पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चाैघांना शस्त्रांसह अटक
ArrestSaam Tv

जून्नर : आळेफाटा परिसरात पेट्रोल (petrol) पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराइत गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी (police) शस्त्रांसह अटक (arrest) केली आहे. या टोळीत मोक्कातील फरार आरोपीचाही सहभाग आढळुन आला असुन चार जणांना अटक करण्यात आली असून आणखी तिघे फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (junnar latest marathi news)

ही टाेळी नगर-कल्याण (nagar kalyan highway) आणि पुणे नाशिक महामार्गावरील (pune nashik highway) पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात तयारीत हाेती. या टोळीला आळेफाटा पोलीसांनी सापळा रचून अटक केली. या टोळीने आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच व पारनेर अहमदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Arrest
Accident: मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; जुन्या मार्गावरुन वाहतुक सुरु

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार नवनाथ पवार, अनिकेत पवार, अंकुश पवार, प्रवीण आंबेकर अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहे. या प्रकरणी आणखी तिघांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Rajgurunagar: गावठी पिस्तुलासह राजगुरुनगरात युवकास अटक; LCB ची कारवाई
Arrest
Satara: सातारकरांनाे सावधान! नारळ फाेड्या गॅंग आली : शिवेंद्रसिंहराजे भाेसले
Arrest
NIA ची मुंबईत पुन्हा मोठी कारवाई; डी गँगशी संबंधित दोघांना अटक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.